ADIWASI DHADAK MORCHYA NANDED

मुळ आदिवासींनी दिला ‘बोगस हटाव’ चा नारा
जिल्हाधिकारी कार्यालयावर मुळ आदिवासींचा धडक मोर्चा
50 हजाराहून अधिक आदिवासी बांधवांचा सहभाग
प्रतिनिधी, नांदेड, 
                                      दि. 09 नोव्हेबर आदिवासी समाजाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यासह मराठवाड्यातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने पारंपारीक वेशभुषेत सहभागी झाले. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. सुमारे 50 हजाराहुन अधिक मुळ आदिवासी बांधव या धडक मोर्चात सहभागी झाले होते.
राज्यात बोगस आदिवासींनी अनेक योजनेचा फायदा घेतला आहे. बोगस आदिवासींना खैरात वाटप करुन सरकारने मुळ आदिवासीवर अन्याय केला असून हा अन्याय दुर करावा तसेच मुळ आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. संतोष टारपे, माजी आ. भिमराव केराम, माजी आ. उत्तम इंगळे, राज्य आदिवासी कल्याण संघाचे माजी राज्याध्यक्ष दादाराव टारपे यांनी केले.
                                      सर्वोच्च न्यायालयात दि. 6 जुलै 2017 रोजी अनुसुचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत निर्णय दिला होता. परंतु अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंध आदिवासी जमाती संदर्भात बदनामी करणार्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत दि. 3 ऑक्टोंबर 2017 रोजी जात वैधतेच्या बाबत घेतलेला निर्णय अनुसुचित जमातीला लागू करण्यात येवू नये, नांदेड जिल्हा गॅझेटीयर 1961 च्या जनगननेप्रमाणे नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू व महादेव कोळी या जमाती अस्तित्वात नसल्याने त्यांना दिलेले बोगस जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच विशेष तपासणी समितीचे काम समाधानकारक नसून विशेष तपासणी समितीने आपले कार्य चोखपणे करावेत, आंध, आदिवासी जमातीचा अवमान व अवेलना करणार्यापविरुद्ध ऍट्रासिटी कायद्यानुसार गुन्हे नोंदवावेत या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आंध, गौंड, परधान, भिल्ल, नाईकडा, कोलाम, पारधी आदी मुळ आदिवासींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
                                         या मोर्चाची सुरुवात शहरातील नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मैदानापासून करण्यात आली. नवीन मोंढा, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात सखाराम वाकोडे, प्रा. किशन मिराशे, प्रा. किशन फोले, प्रा. डॉ. शेकोबा ढोले, दादाराव टारपे, डॉ. बळीराम बुरके, शेषेराव कोवे, प्रा. विजय खुपसे, डॉ. हणमंत रिठ्ठे, राम मिराशे, रत्नाकर बुरकुले आदींचा सहभाग होता.
                                         या मोर्चात मुळ आदिवासी पारंपारीक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच बरोबर या मोर्चात आदिवासी सांस्कृतीक कलापथके सहभागी झाली. या कला पथकाने मुळ आदिवासींच्या समस्या मोर्चा दरम्यान मांडल्या. मराठा मुकमोर्चा, निर्धार मोर्चा आणि मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चानंतर आज आदिवासी बांधवांनी काढलेल्या या मोर्चाने नांदेडकरांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले.
नाम सदृष्याचा फायदा घेवून मुळ आदिवासींवर अन्याय केला असून नाम सदृष्याचा फायदा घेणार्या  बोगस आदिवासींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मोर्चात सहभागी नेत्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असतानाही या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. बोगस आदिवासींनी मुळे आदिवासींच्या नौकर्यात बळकावल्या आहेत. विशेष तपास समितीही योग्य कार्य करत नसल्याने आज हा मोर्चा काढण्यात येत आहे. मार्चानंतरही मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचल्यानंतर सहभागी नेत्यांनी आपली भुमिका व्यक्त केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांोना मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात नांदेड जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते.


[blogger]

Author Name

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.